Search across all devotional content
सभी भक्ति सामग्री में खोजें
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी |
बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई |
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू |
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा |
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण |