Bhajan भजन

आनंदले रंगले दंगले

Ram श्री राम
Lyrics बोल

आनंदले रंगले दंगले,आनंदले रंगले दंगले ॥
भाव सुमने माळून ,भक्ति चंदने लेपून ॥
रोम रोमातून मी गंधले,
आनंदले रंगले दंगले......

जिथे ठेविले मस्तक, तिथे तुझे रे चरण
जिते-तिथे पाही देवा , तुझे रूप हे लोचन

मूक जाहली रे वाचा, अश्रु अमृत पिऊन,
हृदयातल्या स्पंदनी, हरी नाम उच्चारण
(श्री राम जय राम , जय जय राम )

ऐसा कृपेचा वर्षाव, तुडुंबला भक्ति भाव
अंग अंग अंतरंग ... चिंबले || १||

गीत-संगीत : अरुण सराफ

Watch & Listen सुनें और देखें