Bhajan भजन

गजानना श्री गजानना

Ganesh गणेश जी
Lyrics बोल

विनायका , गणराया , गजानना …

गजानना श्री गजानना , गजानना
करू तुझी प्रार्थना, आम्हा पाव ना , रे शिवनंदना

तू आदी अन तूची अनंता
तू विधाता एकदंता
हे दयाळू , हे कृपाळू , तुला कोटी वंदना ॥ १॥

दे आम्हा तू ऐसी दृष्टी
तुजसम लागे सारी सृष्टी
दीन दु:खी सेवा रूपी, घडो तुझी साधना || २॥

नको सुखाचा भोग आम्हाला
जडो भक्तिचा रोग आम्हाला
लोभ मोह निर्बंध तोडूनी, येऊ तुझ्या दर्शना || ३ ॥

गीत - संगीत : अरुण सराफ
गायक : किशोर देशमुख
अल्बम : हृदयी रहा रे दयाघना

Watch & Listen सुनें और देखें