मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला.....
भक्तासाठीं तो जगजेठी, कुब्जेसी रत जाला, मनमोहन मुरलीवाला....
विदुरा घरच्या भक्षुनि कण्या, परमानंदें धाला, मनमोहन मुरलीवाला....
भक्तिसुखें सुखावला, एका जनार्दनीं निमाला, मनमोहन मुरलीवाला.....